Belagavi

आपल्या फोटोशी छेडछाड करून अश्लील फोटो व्हायरल : शशिकांत पाटील

Share

 भाजप बेळगाव दक्षिण मंडळच्या व्हॉट्स अप ग्रुपवर आपल्या फोटोशी छेडछाड करून अश्लील फोटो व्हायरल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण भाजप बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिले.

या प्रकरणाबाबत शशिकांत पाटील यांनी एका व्हिडीओमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. व्हॉट्स अप ग्रुपवर व्हायरल होत असलेला फोटो आपला नसून, आपला फोटो मॉर्फ करून तो व्हायरल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या फोटोशी माझा काहीही संबंध नाही. याची चौकशी करण्याची मागणी मी केली आहे. चौकशीअंती सत्यता बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

Tags: