बेळगावच्या बी. ए. सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘कुटुंबांची नावे आणि विश्लेषण‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
बेळगावातील शिवबसव नगरातील चंद्रगिरी महिला शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. गदग डम्बळ येथील तोंटदार्य मठाचे डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामींच्या यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रा. बी.एफ. कल्लन्नवर यांनी लिहिलेल्या “कुटुंब नावे: स्वरूप आणि विश्लेषण” या पुस्तकाचे प्रकाशन केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. एस. एस. अंगडी म्हणाले, “हे पुस्तक घरातील सांस्कृतिक विश्व उलगडून दाखविते. ६ मुख्य अध्यायांमध्ये पुस्तक लिहीले आहे. लेखनामागे संशोधक वृत्ती आणि साहित्यिक शिस्त दर्शवते.”
या प्रसंगी ए. ए. सनदी, डॉ. सरजू काटकर, लेखक बी. एफ. कल्लन्नवर, डॉ.रामकृष्ण मराठे आदी उपस्थित होते.