State

कोणाला त्रास होणार नाही अशा वाहतूक सुधारणा करणार : बोम्मई

Share

वाहनचालक आणि जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने टोईंग आणि वाहतूक सुधारणा करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येतील असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आज काही विकासकामांच्या उदघाटन समारंभात सहभागी होणार आहे. सायंकाळी काही बैठक आहेत. त्यानंतर बेंगळूरचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभाग अधिकाऱ्यांना बोलावून टोईंग आणि वाहतूक सुधारणांबाबत माहिती घेणार आहे. वाहनचालक आणि जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सुधारणा करण्याच्या सूचना त्यांना देणार आहे असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

 

Tags: