जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, सीआयजेडब्ल्यू स्कुल आणि अलायन्स क्लबतर्फे बेळगावात कायदा साक्षरता शिबीर घेण्यात आले.
न्यू वंटमुरी-हालभावी येथे झालेल्या कायदा साक्षरता शिबिरात पॉक्सो, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक न्यायालय कायदा, महिला सबलीकरण आणि महिला मालमत्ता कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. विजय देवराज अरस यांनी केले.
यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाचे डीआयजी हरिंदर पाल, अलायन्स क्लबचे चार्टर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऍड. दिनकर शेट्टी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नवीना शेट्टीगार आदी उपस्थित होते. यावेळी कायदा सल्लागार रूपा महानंद पाटील, केएलई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. सुजाता पै, उच्च न्यायालयाच्या ऍड. मीनल कालकुंद्रीकर यांनी विविध कायद्यांबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. शिबिरात अलायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सोमशेखर हुडेद, ऍड. गंगाधर बाळेकुंद्री उपस्थित होते.