Belagavi

पिरनवाडी चौक बनला छत्रपती शिवाजी महाराज चौक

Share

बेळगावः बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथील उभारण्यात आलेल्या संगोळी रायाणा पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले.

जिल्हा प्रशासनान आणि पिरनवाडी ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निणॆया नूसार या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठया प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा फलकाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

क्रांतीवीर संगोळी रायाणा यांचा पुतळा उभारण्यात आल्या नंतर या ठिकाणी वाद निर्माण झाला होता. मात्र आता या वर तोडगा काढण्यात आला असून या परिसराचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे.

एकंदरीत या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पिरनवाडी ग्रामस्थांच्या बैठकीत या वर तोडगा काढण्यात आला. त्या मूळे परिसरातून समाधान होत आहे.

Tags: