Belagavi

२४X७ तास सेवा देणाऱ्या वेलनेस मेडिकलची वडगावमध्ये शाखा सुरु

Share

बेळगावातील वडगाव परिसरातील लोकांच्या आरोग्य सेवेत २४X तास सेवा देणाऱ्या वेलनेस मेडिकलचे नवे दालन आजपासून खुले झाले आहे.

होय, अल्पावधीतच वेलनेस मेडिकल कंपनीने देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. कर्नाटकाची दुसरी राजधानी म्हणविल्या जाणाऱ्या बेळ्गावमध्ये कंपनीने आपली आठवी शाखा सुरु केली आहे. वडगावातील येळ्ळूर रोडवरील संभाजीनगर येथे डॉ. प्रसाद एस. यांच्याहस्ते रविवारी वेलनेस मेडिकलच्या नव्या दुकानाचे उदघाटन करण्यात आले.

उदघाटनानंतर ‘आपली मराठी’सोबत बोलताना डॉ. प्रसाद एस. म्हणाले, या भागात २४X७ तास सुरु राहणारे मेडिकल शॉप नव्हते. वेलनेस मेडिकल शॉपमुळे या भागातील लोकांना ही सेवा मिळणार आहे.

त्यानंतर बोलताना एरिया मॅनेजर मृत्यूंजय यादव म्हणाले, वेलनेस मेडिकल शॉपमध्ये सर्व कंपन्यांची औषधे उपलब्ध आहेत. कुठल्याही ग्राहकाला हे औषध नाही म्हणून परत पाठविले जात नाही. त्याशिवाय ग्राहकांना अनेक चांगल्या ऑफर्सही दिल्या जातात. त्याचा या भागातील नागरिकांनी सदुपयोग करून घ्यावा. आमच्याकडे पर्सनल केअर, बेबी केअर, हेल्थ प्रॉडक्ट्स, वुमेन हायजीन, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, ऍलोपॅथिक मेडिसिन्स, रिहॅबिलिटेशन प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक मेडिसिन्स, सर्जिकल आयटम्स, ब्लडप्रेशर मॉनिटर आदी उत्पादने उपलब्ध आहेत.

यावेळी कामोनीचे एक्झिक्युटिव्ह जितेंद्र चव्हाण म्हणाले, वडगाव परिसरातील नागरिकांना औषधांची होम डिलिव्हरीसुद्धा देण्यात येणार आहे. या सेवांचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्टोअर मॅनेजर विनायक नाईक, अनुप मौर्य, गणेश गौड यांच्यासह सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Tags: