Vijaypura

काँग्रेसने संगमेष बबलेश्वर यांना उमेदवारी द्यावी यासाठी सोशल मीडियावर मोहीम

Share

वायव्य शिक्षक मतदार संघातून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने संगमेष बबलेश्वर यांना उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली आहे.

होय, भाजपने या निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने मात्र अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संगमेष बबलेश्वर याना उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली आहे. काँग्रेस हायकमांडने या मागणीची दखल घ्यावी असे आवाहन याबाबतच्या संदेशात केले आहे. माजी मंत्री एम. बी. पाटील यांनाही याबाबत आवाहन करण्यात आले आहे. बबलेश्वर यांनी शिक्षणसंस्था चालवत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना काळात व इतरवेळी केलेल्या समाजकार्याचा दाखला देऊन शिक्षणसंस्थेत विद्यार्थ्यांचे शुल्क अर्ध्याने कमी केले याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ते चांगले कार्य करतील. त्यामुळे वायव्य शिक्षक मतदार संघातून संगमेष बबलेश्वर यांनाच काँग्रेसने उमेदवारी द्यावी असे आवाहन केलेला मजकूर संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. फ्लो

Tags: