बेळगाव मधील ग्रुप डी कर्मचारी संघाच्या वतीने 2022 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कर्नाटक राज्य सरकारी शिक्षण विभाग, लिपीक, वाहन चालक तसेच ग्रुप डी कर्मचारी संघाच्या वतीने 2022 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. बेळगावच्या सरकारी बीएड कॉलेज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमात सी टी ई सहसंचालक आणि प्राचार्य राजीव नायक यांनी संघाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्याचे कौतुक केले. तसेच आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवांवर भर देण्यासंदर्भात आवाहन देखील केले.
तसेच कार्यदर्शी वॉल्टर एचडी यांनी दिनदर्शिकेचे कौतुक केले. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून दैनंदिन कामासंदर्भात माहिती मिळण्यास सहकार्य होते असे सांगितले. याप्रमाणे संघाच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाला डायट उपसंचालक सिंदूर एम ए, उपसंचालक बीएम नालवतवाड, आर. जुट्टंनावर, रवी भजंत्री, वरिष्ठ सहाय्यक संचालक एस पाटील आदी उपस्थित होते.