Belagavi

बेळगाव जिल्ह्यात भक्तांना मंदिरे झाली खुली

Share

कोविडचा वाढत संसर्ग लक्षात घेता बेळगाव जिल्ह्यात बजावलेलादेऊळबंदचा आदेश आता शिथिल करण्यात आलाय.

होय, कोविडचे ओमीक्रॉनच्या माध्यमातून पुन्हा एकदा थैमान सुरु झाल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे, देवस्थानात भक्तांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून जाण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला होता. आता सरकारच्या आदेशावरून किरकोळ निर्बंधांसह मंदिरे भक्तांना खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सोमवारी हा आदेश बजावला.

सौंदत्तीचे श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान, जोगुळभावी सत्यव्वा, रामदुर्ग तालुक्यातील गोडची वीरभद्रेश्वर, रायबाग तालुक्यातील चिंचली मायाक्का, दत्त देवस्थान, अथणी तालुक्यातील बसवेश्वर देवस्थानसह बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख देवस्थानांमध्ये हा आदेश लागू करण्यात आला आहे. मंदिरे-देवस्थानात लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या कमाल ५० लोकांना एकावेळी पूजाअर्चा, सेवा करण्यासाठी एकत्र जमता येईल. मात्र जत्रा-उत्सव यावर बंदी कायम राहील. सरकारने आज ३१ जानेवारीपासून नाईट कर्फ्यूसह सर्व कोरोना निर्बंध मागे घेतल्याने हा आदेश बजावण्यात आलाय.

 

 

Tags: