विजापूरचे माजी आ. एम. एम. सज्जन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
माजी आ. एम. एम. सज्जन यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. तत्कालीन अखंड विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ मतदारसंघाचे १९७२ ते ७८ या काळात त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यांच्यावर आज दुपारी ४ वा.च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनावर अनेक मठाधीश, राजकारणी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.