Vijaypura

विजापूरमधील गानयोगी संघाच्या युवकांचा अभिनव उपक्रम

Share

सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो फॉलोवर्स असलेल्या युवकाने आणि युवकाच्या संघाने विजापूर शहरात अनेक समाजाभिमुख उपक्रम आजवर राबविले आहेत , केवळ कॉमेडी नाही तर सामाजिक संदेश देणाऱ्या विजापूरमधील गानयोगी संघाच्या युवकांनी विजापूरमधील स्वच्छतेचा दयास घेतला आहे. युवकांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल जाणून घेऊयात या पुढील रिपोर्टमधून…..

केवळ समाजात सोशल मीडियाच्या माध्यमातून भन्नाट विनोदी संकल्पना मांडणे इतकेच काम न करता विनोदासह समाजाभिमुख कार्य करण्याचीही परंपरा विजापूरमधील गानयोगी युवक संघाने जपली आहे . प्रत्येक आठवड्यात बसस्थानक, बाजारपेठ, सार्वजनिक विहिरी यासह अनेक ठिकाणांची स्वच्छता मोहीम या युवकांच्या माध्यमातून हाती घेण्यात येते . प्रकाश आर के या युवकाने आपल्या सहकाऱ्यांच्या सहयोगाने विजापूरमध्ये गानयोगी संघाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले आहे. गानयोगी संघाच्या माध्यमातून या युवकांच्या संघाने शहरातील स्टेशन रोड, दरबार हायस्कुल जवळील बस स्थानक याठिकाणांची स्वच्छता करून पूर्णपणे कायापालट केला आहे.

शहरातील दरबार हायस्कुल नजीक असलेल्या बसस्थानकावर गुटखा, तंबाखू, सिगारेटची थोटके आणि इतर कचऱ्यामुळे गलिच्छ वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात अस्वच्छता निर्माण तर झालीच होती परंतु येथील कचऱ्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. या बसस्थानकाची पूर्णपणे स्वच्छता करून रंगरंगोटी करून बसस्थानकाचा कायापालट गानयोगी संघाच्या युवकांनी केला आहे.

या स्वच्छता मोहिमेत संतोष चव्हाण, बाहुबली शिवण्णावर , रवी रत्नाकर, राजकुमार होसट्टी, विकास कंबागी , सचिन पालिकार , महेश कुंभार, आनंद होणवाड , प्रमोद चव्हाण, रेवणसिद्धय्या हिरेमठ, विठ्ठल गुरुविण, श्रीशैल कुमसगी, विरेश सोन्नलिंगी, श्रीशैल जुमनाळ, सचिन चव्हाण, राहुल एम, बाबू आदी उपस्थित होते.

Tags: