Vijaypura

विजापूर शहरासह खेड्यांत भूकंप

Share

भूकंपाच्या धक्क्यांनी विजापूर शहर आज पुन्हा एकदा हादरले. सकाळी जाणवलेल्या भूकंपामुळे विजापुवासीयत पुन्हा एकदा दहशत पसरल्याचे पहायला मिळाले.

होय, रविवारी सकाळी ९. ५ च्या सुमारास विजापुरात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता २.९ इतकी मोजण्यात आली. विजापूर शहरासोबतच निंगनाळ, भरटगी, गुगरड्डीसह अनेक गावांत हा भूकंप जाणवला. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. जमिनीखाली ५ किमीच्या आत खोलवर हा भूकंप झाला. कर्नाटक राज्य आपत्ती निवारण विभागाने भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, वरचेवर विजापूर जिल्ह्यात कुठे ना कुठे भूकंप होत असल्याने नागरिक मात्र भयभीत होत आहेत.

 

Tags: