महिला सातत्याने घरकामात व्यस्त असतात. घरकामासहित अनेक महिला नोकरी आणि व्यवसायदेखील सांभाळतात. त्यांच्या बिझी शेड्युलमधून काही वेळ त्यांच्या वैयक्तिक विश्रांतीसाठी मिळावा, या हेतूने विजापूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील गॅंग बावडी येथील अदृश्य लक्ष्मी मंदिर परिसरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या छायेखाली काल प्रजासत्ताक दिन सर्व सुरक्षेच्या उपाययोजनांसह साजरा करण्यात आला. प्रजासत्ताकदिनाच्या संध्याकाळी विजापूर येथील पतंजली योग्य समिती, महिला पतंजली योग्य समिती आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट यांच्यावतीने काल ७५ व्या स्वातंत्र्योत्सवाच्या अमृतमहोत्सवाच्या औचित्याने ७५ कोटी सूर्यनमस्कार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक महिलांनी समान गणवेश परिधान करून मास्कचा वापर करून सूर्यनमस्कार अभियानात सहभाग घेतला,
या कोटी सूर्यनमस्कार अभियानात विविध कॉलनीतील अनेक महिलांनी सहभाग घेतला. संपूर्ण कुटुंबाला सांभाळणाऱ्या गृहलक्ष्मीचे आरोग्य अधिक बळकट करण्यासाठी सूर्यनमस्कार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी सूर्यनमस्कार अभियानात सहभाग घेऊन आपल्या दैनंदिन आयुष्यातील बिझी शेड्युलमधील काही भाग रिलॅक्सपणे एन्जॉय केलाय.