बेळगाव शहरात प्रथमच आगमन झाल्यानिमित्त दिगंबर जैन समाजाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे आज बेळगावात भव्य स्वागत करण्यात आले.
शहरातील टिळक चौकात स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे जैन श्रावक-श्राविकांनी पाद्यपूजा करून श्रद्धा-भक्तीने स्वागत केले.
यावेळी बोलताना जैन समाजाचे नेते राजीव दोड्डण्णावर म्हणाले, आज आमच्यासाठी उत्साहाचा दिवस आहे. बेळगाव शहरात प्रथमच आगमन झाल्यानिमित्त दिगंबर जैन समाजाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे आज आगमन झाले आहे. त्यानिमित्त समाजातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे.
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी ऐतिहासिक बेळगाव शहरात प्रथमच आगमन करत असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. येथील श्रावक-श्राविकांनी केलेल्या स्वागताबद्दल समाधान व्यक्त करून सर्वाना आशीर्वाद दिले.
त्यानंतर स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांची टिळक चौकातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्लीमार्गे मठ गल्लीतील चिक्क बस्तीपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जैन युवक मंडळ, आराधना महिला मंडळ, धारिणी महिला मंडळाचे कार्यकर्ते तसेच दिगंबर जैन समाजाचे नागरिक उपस्थित होते.