Belagavi

‘त्या’ १७ जणांचा त्याग मोठा; त्यांच्यामुळे सत्तेचीफळे चाखताय हे विसरू नका : आ. भालचंद्र जारकीहोळी

Share

 मी किंवा रमेश पक्षविरोधी कारवायांत गुंतलेलो नाही. रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील अशा १७ आमदारांनी केलेल्या त्यागामुळे तुम्ही आज सत्तेची फळे चाखताय. हे विसरू नका अशा शब्दांत केएमएफचे अध्यक्ष आणि अरभावीचे . भालचंद्र जारकीहोळी यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले.  

गोकाकमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलताना आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, ते १७ आमदार भाजपमध्ये आले नसते तर आज कोणीही मंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य झाले नसते. त्यांच्या त्यागामुळे आज तुम्ही सत्ता उपभोगताय. ते आल्यामुळेच सगळे झालेय. कृपा करून त्यांचा त्याग विसरू नका. आपसातील मतभेद बाजूला ठेवून बेळगाव जिल्ह्यात पक्ष आणखी मजबूत करू असे आवाहन त्यांनी विरोधकांना सुनावले.

भाजपात सुरु झालेले भांडण सौहार्दाने मिटवू, सगळे एक होऊ, पुढील निवडणुकीत पुन्हा आम्हीच विजयो होण्यासाठी प्रयत्न करणे चांगले हे मी सगळ्या नेत्यांना सांगू इच्छितो. वरिष्ठांनी सांगण्यापूर्वीच संपूर्ण राज्याला एकत्र करू शकणारे नेते बेळगाव जिल्ह्यात आहेत. रमेश जारकीहोळी, उमेश कत्ती, लक्ष्मण सवदी, जोल्ले सगळे मिळून एकत्र बसून चर्चेने समस्या सोडवू. कारण आम्ही सगळे एकाच पक्षात, भाजपमध्ये आहोत. आम्हीच पक्ष बांधला पाहिजे. पक्ष पुन्हा सत्तेवर यावा हीच सगळ्यांची इच्छा आहे. सगळे मिळून ही समस्या सोडवून हा विषय येथेच संपवू, पुढे अशी समस्या उदभवणार नाही याची काळजी घेऊ असे आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.

केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे लक्ष्मण सवदी यांच्या संपर्कात असल्याच्या लखन जारकीहोळी यांनी केलेल्या विधानावर, तो विषय मला माहित नाही, माहित असलेल्या विषयावरच बोलतो असे ते म्हणाले.  काँग्रेसचे तिन्ही आमदार मात्र भाजपच्या संपर्कात आहेत. पुढील निवडुकीवेळी भाजपमध्ये येणार आहेत या रमेश जारकीहोळी यांच्या विधानावर, बाकीच्या राजकारणाबाबत मला काहीही माहिती नाही असे भालचंद्र म्हणाले. रमेश याना मंत्रिपद देण्यासंदर्भात ते म्हणाले, त्यांना मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कोर्ट केसमुळे थोडा विलंब होत आहे. एकदा का खटला संपला की रमेश याना नक्कीच मंत्रिपद मिळेल असे आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. बाईट

गोविंद कारजोळ याना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यास जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांचाच विरोध असल्याबाबतच्या प्रश्नावर आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, त्या जिल्ह्याच्या मंत्र्याला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊ नये असा निर्णय पक्षाच्या पातळीवर झाला आहे. त्यामुळे गोविंद कारजोळ बागलकोट जिल्ह्याचे असले तरी त्यांना काही दिवस बेळगावचे पालकमंत्री राहू द्या, चांगले काम करू द्या, आम्ही त्यांना पक्षवाढीसाठी सहकार्य करू असे आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. बाईट

एकंदर, बेळगाव जिल्हा भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. हेच आ. भालचंद्र जारकीहोळी यांच्या विधानावरून स्पष्ट होते. हे भांडण वाढते का चहाच्या पेल्यातील वादळ ठरते हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

पॉलिटिकल ब्युरो, आपली मराठी, बेळगाव

 

‘त्या’ १७ आमदारांचा त्याग मोठा

त्यांच्यामुळे सत्तेचीफळे चाखताय हे विसरू नका

आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी विरोधकांना सुनावले

 

Tags: