मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज बेंगळूर येथे कर्नाटक राज्य खाद्यान्न महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.
होय, कर्नाटक राज्य खाद्यान्न महामंडळाची आढावा बैठक आज बेंगळूर येथे घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बसवराज बोम्मई होते. यावेळी खाद्यान्न महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला कृषी मंत्री बी. सी. पाटील, खा. शिवकुमार उदासी, विधान परिषद सदस्य वाय. ए. नारायणस्वामी, सरकारच्या मुख्य सचिव आणि विकास आयुक्त वंदिता शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद, कर्नाटक वाणिज्य आणि उद्योग मंडळाचे अध्यक्ष डॉ. आय. एस. प्रसाद, फुड पार्क महासंघाचे अध्यक्ष के. एम. श्रीनिवासमूर्ती आदी उपस्थित होते.