कोविड महामारीने बळी गेलेल्या बीपीएल कुटुंबातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते बंगळुरात भरपाई रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले.
बेंगळुरातील केआर पूर विधानसभा मतदार संघातील बीपीएल कुटुंबातील एकूण ९५ जणांचा कोरोना महामारीने बळी घेतला आहे. या सर्वांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपये भरपाई रकमेचे धनादेश आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री भैरती बसवराज, आरोग्य सचिव डॉ. के. सुधाकर, सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, बृहत बेंगळूर महानगरपालिकेचे प्रशासक राकेश सिंग, मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांच्यासह सरकारी अधिकारी आदी उपस्थित होते.