Belagavi

राज्योत्सवासाठी डीसीपींची कन्नड संघटनांसोबत बैठक

Share

१ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कन्नड संघटना आणि बेळगाव पोलीस उपायुक्त रवींद्र गडादि यांची मार्केट पोलीस स्थानकात बैठक पार पडली.

राज्योत्सव मिरवणुकीसाठी राज्यातील विविध भागातील लोक बेळगावमध्ये दाखल होतात. यावेळी मिरवणुकीत डॉल्बीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मात्र यंदाच्या मिरवणुकीत डॉल्बीचा वापर टाळावा आणि भव्य मिरवणुकीचे आयोजन करावे, असे आवाहन डीसीपी रवींद्र गडादि यांनी कन्नड संघटनांना केले आहे. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे आलेल्या मर्यादा पाळून साजरा झालेला राज्योत्सव यंदा जल्लोषात साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती यावेळी कन्नड संघटनानी केली. मात्र डीसीपींनी राज्योत्सव मिरवणुकीतील इतर गोष्टी वगळता डॉल्बीचा वापर टाळण्याची सूचना केली. ()

कोरोना आणि लॉकडाऊन नंतर अनेक कार्यक्रमातील डॉल्बी वापरावर मर्यादा आणण्यात आल्या असून डॉल्बीचा वापर करणाऱ्यांवर आम्ही कारवाई केली असल्याचे डीसीपींनी सांगितले. कायदा सर्वांसाठी समान असून डॉल्बीचा वापर टाळून राज्योत्सव मिरवणूक जल्लोषात साजरी करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यावेळी कन्नड संघटनांनी गणेशोत्सवातील डॉल्बीच्या वापराचाही मुद्दा उपस्थित केला.

या बैठकीला एसीपी नारायण बरमणी, एसीपी चंद्रप्पा, कन्नड संघटनेचे महादेव तलवार, दीपक गुडगनट्टी, अनंत ब्याकोड, वजीद हिरेकुडी, सुरेश गव्हाण्णावर, गणेश रोकडे आदी उपस्थित होते.

Tags: