मतदान यादीतून अनेकांची नावे वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे मतदारांनी सावध होणे आवश्यक आहे . याबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी मतदारांना महत्वपूर्ण माहिती दिली आहे .
: निवडणूक आयोगाने सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून , मतदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याची गरज आहे . मतदारांना प्रत्येक गोष्ट सोयीची करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत .
मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही . त्याकरता सरकारने वोटर्स हेल्पलाईन सुरु केली आहे . या माध्यमातून , मतदार यादी तपासणे , तसेच नाव दाखल करता येऊ शकते .
त्याचप्रमाणे नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल च्या माध्यमातून मतदार यादीची पडताळणी करता येऊ शकते . शासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचा उपयोग करून घेऊन , मतदारांनी मतदार यादीची तपासणी करावी . यादीत आपले नाव आहे का याची खात्री करून घ्यावी असे आवाहन सुजित मुळगुंद यांनी केले आहे