Belagavi

संधींचा प्रभावीपणे वापर करून जीवनातील सर्वोच्च ध्येय गाठा : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

Share

शैक्षणिक जीवनात उपलब्ध असलेल्या संधींचा प्रभावीपणे वापर केला तरच जीवनातील सर्वोच्च ध्येय गाठता येते असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

बेनकनहळ्ळी येथील बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमीने आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या.

नुसता अभ्यासक्रम वाचून सर्व काही साध्य करता येत नाही. बौद्धिक विकासासाठी शारीरिक तंदुरुस्ती देखील आवश्यक आहे. यासाठी अभ्यासासोबत क्रीडा उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने खेळात सहभागी होऊन कर्तृत्वाचे शिखर गाठावे, असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

 


तत्पूर्वी त्यांनी क्रीडा ध्वजारोहण करून क्रीडास्पर्धांना चालना दिली.

यावेळी प्राचार्य जोसेफिन गुंटी, शैक्षणिक संचालिका रचना गोर्ले व बेन्सन्सचे सर्व पदाधिकारी व विध्यार्थी उपस्थित होते.

Tags: