Belagavi

बेळगाव शहरामध्ये “बेळगावी आर्ट फेस्टिवल ” :निवडक उत्तम कलाकृती प्रदर्शनात

Share

बेळगाव शहरामध्ये “बेळगावी आर्ट फेस्टिवल ” अंतर्गत आर्ट प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता .

बेळगावमसील सपना बुक हाउस मध्ये ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रोस्टरूम डायरीज , मागील 8 वर्षांपासून , बेळगावच्या कलाकारासाठी काम करीत आहेत . मागील २ वर्षांपासून ऑनलाईन द्वारे आर्ट प्रदर्शन कार्यक्रम घेत आहेत . यंदा देखील हे आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता . बेळगाव सांबारा विमानतळाचे संचालक राजेश मौर्य यांच्या हस्ते या आर्ट प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले .


यावेळी मेरी राघवन , डॉ . माधव प्रभू , उपस्थित होते . मान्यवरांनी प्रदर्शनातील चित्रकृतींची पाहणी केली .
यावेळी बोलताना आयोजक अभिषेक यांनी सांगितले कि , दरवर्षी आम्ही आयोजित करीत असलेल्या आर्ट फेस्टिवल चांगला प्रतिसाद लाभत आहे . यंदा चार महिन्यांपासून आम्ही या फेस्टिव्हलची तयारी करीत होतो . ऑनलाईन द्वारे कलाकारांना आवाहन केल्यानंतर , सुमारे 45 लाख कलाकारांनी प्रतिसाद दिला आहे .त्यातून प्रख्यात चित्रकार शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधी हजार कलाकारांची निवड केली . दोन गटांमध्ये प्रत्येकी दहा जणांची निवड केली आहे . निवडक उत्तम कलाकृती आम्ही प्रदर्शनात ठेवल्या आहेत . आणि त्या कलाकारांना प्रमाणपत्र तसेच पारितोषिक देऊन गौरवले आहे .


हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .

Tags: