Belagavi

कडोलीत उद्या भव्य ‘मी हिंदू’ मेळावा

Share

कडोली येथील शिवाजी हायस्कूल जवळील श्री शिवाजी स्टेडियमवर ‘मी हिंदू, हा भव्य जागृती मेळावा उद्या शनिवार दि.१७/१२/२२ रोजी संध्याकाळी ठिक ६.३०. वाजता आयोजित केला आहे.

कडोली जिल्हा पंचायत, यमकनमर्डी विधानसभा मतदार संघासह बेळगाव भागातुन लाखो हिंदु बंधु भगिनी या मेळाव्यास जमणार आहेत अशी माहिती भाजप नेते रवी हंजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यमकनमर्डी येथे नुकत्याच झालेल्या भव्य मी हिंदू संमेलनानंतर त्याच धर्तीवर ‘जागो हिंदु’ मेळावा होणार आहे. हिंदू धर्माबाबत जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. मुख्य वक्ता म्हणून हिंदु राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई पुणे,

हुक्केरीचे अभिनव स्वामीजी, इचलकरंजीचे स्वामीजी आदी उपस्थित राहणार आहेत. हस्तकला विकास महामंडळाचे अध्यक्ष मारूती अष्टगी माजी जिल्हा पंचायत सदस्य उदय सिद्धण्णवर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सिदलिंग सिद्धगौडर, श्रीशैल यमकनमर्डी, शिवानंद मसगुप्पि, मंजुनाथ हंपण्णवर, डॉ. रवि पाटील, इराप्पा पाटील, भरमा सनदी, चंद्रकांत कापशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Tags: