Hukkeri

हिरण्यकेशी साखर कारखाना देणार 2850 रुपये प्रतिटन ऊस दर

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील प्रसिद्ध हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याने या वर्षाचा उसाचा भाव जाहीर केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी 2850 रुपये प्रति मेट्रिक टन दर जाहीर केला आहे.

कारखाना कार्यस्थळावर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी 2850 रुपये प्रति मेट्रिक टन दर जाहीर केला आहे. 2022-23 या हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्‍यांना 2850 रुपये प्रति मेट्रिक टन भाव देण्याचा निर्णय घेतला आहे, कारण ऊस उत्पादक शेतकरी संपूर्ण उसाचा पुरवठा करत आहेत. हिरण्यकेशी साखर कारखान्याकडे चालू हंगामात सुमारे 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस पाठविण्याची विनंती त्यांनी केली.

हिरा साखर कारखाना कर्जबाजारी असल्याचा आरोप एका माजी मंत्र्यांनी केला आहे. त्यासंदर्भात बोलताना निखिल कत्ती पुढे म्हणाले, होय, 10 हजार टीसीडी ऊस गाळप क्षमता विस्तार, 52 मेगावॅट कोजेन प्रकल्प, प्रतिदिन 54 हजार लिटर स्पिरिट उत्पादन आणि 50 हजार लिटर इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी कर्ज घेतले आहे, कारखाना विकण्यासाठी नव्हे असा पलटवार माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्यावर त्यांनी केला.

आगामी निवडणुकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निखिल कत्ती म्हणाले की, आमचे वडील उमेश कत्ती यांच्या निधनाच्या दुःखातून मी आणि आमचे कुटुंब अद्याप बाहेर आलेलो नाही. मी किंवा माझे काका रमेश कत्ती निवडणूक लढवण्याबाबत आमच्या कुटुंबात किंवा पक्षाच्या व्यासपीठावर कोणतीही चर्चा झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आप्पासाहेब शिरकोळी, शिवनायक नाईक, अशोक पट्टणशेट्टी, बसप्पा मरडी, बसवराज कल्लट्टी, एमडी साताप्पा कर्कीनायक उपस्थित होते.

Tags: