Belagavi

उत्तर विभागातील सर्व एस पी ना फोन इन कार्यक्रमाचे आदेश

Share

सर्व एसपींना उत्तर झोनमध्ये फोन-इन कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील असे आयजीपी सतीश कुमार म्हणाले
जिल्हा पोलीस मैदानावर प्रॉपर्टी रिटर्न परेडनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्व एसपींनाही महिन्यातील एक दिवस फोन -इन कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले
गेल्या वर्षभरात बेळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हे शोधण्याच्या प्रकरणांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 70 टक्के यश असल्याचे आयजीपी म्हणाले.

बीट सिस्टीमचा उल्लेख करून ते म्हणाले की, पूर्वी संशयित सापडल्यावर त्यांना पोलिस ठाण्यात आणून बोटांचे ठसे घेतले जात होते. पण आता हायटेकचे युग आहे. बीट पोलिसांनी मोबाईलवर संशयिताचे बोटाचे ठसे दाबल्यास सर्व काही कळेल, त्यामुळे आरोपी लवकर सापडू शकतात, असे त्यांनी सांगितले.

सीमाप्रश्नाबाबत दोन्ही राज्यांतील पोलिस विभागातील संबंध चांगले आहेत. याबद्दल काहीच अडचण नाही . एसपी डॉ. संजीव पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: