Belagavi

अलतगा गावात श्री लक्ष्मी यात्रा कमिटीतर्फे शस्त्रपूजन

Share

अलतगा गावात श्री देवस्थान पंच कमिटी व ग्राम पंचायत सदस्य श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी आणि श्री महालक्ष्मी यात्रा नियंत्रण कमिटी यांच्यावतीने समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून श्री लक्ष्मी यात्रेचे शस्त्रपूजन करण्यात आले.
प्रारंभी गावातील हक्कदारांच्या घरी ढोल घेऊन त्यांच्या पडल्या श्री लक्ष्मी मंदिरकडे हलविण्यात आल्या. त्यानंतर यात्रा कमिटीच्या हस्ते पूजन करून गावांमध्ये ढोलच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी लक्ष्मी मंदिर पासून सुरुवात करून पाटील गल्ली शिवाजी चौक मधून अशी ब्रह्मलिंग मंदिरचे पूजन करून पुन्हा माळी भरम गणेश मंदिर चव्हाटा या मार्गे श्री राम मंदिर बाळाबाई आदी ठिकाणी जाऊन त्यानंतर पडल्यांचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर ब्रह्मलिंगेश्वर माध्यमिक विद्यालय शाळेच्या पटांगणात गदगेच्या जागेचे पूजन करण्यात आले यावेळी ग्रामदैव दुर्गामाता मरगाई मंदिर लक्ष्मी इराण्णा मसनाई व महादेव मंदिरात पूजन करण्यात आले त्यानंतर श्री लक्ष्मी मंदिर मध्ये येऊन घुगरेटकर परिवारातर्फे शस्त्रपूजन करण्यात आले.

याप्रसंगी पाटील परिवार ,चौगुले परिवार, कांबळे परिवार, जाधव परिवार, सुतार परिवार, लोहार परिवारतर्फे शस्त्रपूजन विधिवत करण्यात आले त्यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: