महाराष्ट्रात कर्नाटक बसवर दगडफेक करण्यात आल्याने कर्नाटकातून महाराष्ट्रात सीमा मार्गावरून जाणाऱ्या सर्व कर्नाटक बससेवा बंद करण्यात आल्या आहेत
मिरज ते कागवाड दरम्यान कर्नाटक बसवर दगडफेक करण्यात आली आहे . ही कर्नाटकची बस असून ती पुण्याहून अथणीकडे येत होती, काल रात्री 10.30 वाजता चालत्या बसवर दगडफेक करण्यात आली. बसच्या पुढील काचा फुटल्या आहेत . बेळगाव जिल्ह्यातील अथणी आगाराची ही बस आहे. दगडफेकीमुळे, प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन , बेळगाव जिल्हा पोलिसांच्या सूचनेनुसार मिरज आणि कागवाड सीमा मार्गावरून जाणाऱ्या सर्व कर्नाटक बससेवा बंद करण्यात आल्या आहेत.