Accident

विजापुरात ट्रक-बस अपघातात एक जागीच ठार; ३ जखमी

Share

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खासगी बसला ट्रकने धडक दिल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.

विजापूर शहरातील मनगुळी टोल गेटजवळ भीषण अपघात घडला. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत प्रवाशाचे नाव व तपशील उपलब्ध झालेला नाही. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: