घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेल्या न्या. मल्लिकार्जुन गौड यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अखिल भारतीय बौद्ध महासभेने केली आहे.
होय, रायचूरचे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांनी प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांची प्रतिमा हटविण्यास सांगून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करत अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संपूर्ण जगातच भारताचे सर्वोत्कृष्ट संविधान लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा निदर्शकांनी यावेळी दिला.
या निदर्शनांमध्ये अखिल भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष यल्लाप्पा कांबळे, जिल्हा सरचिटणीस शेखर शिंगे, खजिनदार यमनाप्पा गाडीनाईक आदी सहभागी झाले होते.