Belagavi

अरकेरी आयआरबी केंद्राला एडिजीपी आलोककुमार यांची भेट

Share

भारतीय राखीव पोलीस दलाच्या विजापूर अरकेरी फोर्स सेंटरला केएसआरपी एडीजीपी आलोककुमार यांनी भेट देऊन विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.

शुक्रवारी सकाळी विजापूर येथील अरकेरी आयआरबी केंद्राला भेट देऊन एडीजीपी आलोककुमार यांनी परेड परिक्षण केले. याप्रमाणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून समस्यांसंदर्भात चर्चा केली. यानंतर फोर्स सेंटरच्या कमांडंट एस.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बस मधून संचार करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून निर्माण करण्यात आलेल्या गार्डन, क्रीडा मैदान, मुलांसाठी बनविण्यात आलेले उद्यान, बेकरी मिल्क पार्लरचे उद्घाटन केले.

यानंतर सायंकाळी कमांडंट एस डी पाटील यांच्या निवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आलोककुमार यांच्याहस्ते एस डी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कमांडंट एस.डी. पाटील यांच्या कार्याचे आलोककुमार यांनी कौतुक केले. यावेळी विजापूर एसपी आनंदकुमार, कमांडंट रामकृष्ण प्रसाद, बसवराज जिळळे, आर. जनार्धन, बी. एम. प्रसाद, डॉ. रामकृष्ण मुद्देपाल, रमेश बोरगावी हंजा हुसेन, के.एम. महादेव प्रसाद , टी सुंदरराज, बि. डी. लोकेशकुमार आदी उपस्थित होते.

Tags: