Athani

डॉ. बाबासाहेबांच्या अवमानाच्या निषेधार्थ कागवाड बंद यशस्वी

Share

रायचूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासंदर्भात अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ कागवाड बंदची हाक देण्यात आली होती.

विविध दलित संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या कागवाड बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला. कागवाड मधील आंबेडकर सर्कल येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी न्यायाधीश मलिकार्जुन गौडा यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घालून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. बाजारपेठेपासून चावडी मार्गे विजापूर कागवाड मार्गावरील चन्नम्मा सर्कल पर्यंत मानवी साखळीच्या माध्यमातून निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संचालक संजय तळवलकर यांनी न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांना पदच्युत करावे अशी मागणी केली. याव्यतिरिक्त त्यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत केस दाखल करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यानंतर डीएस जिल्हा संचालक श्रीकांत तळवार यांनी न्यायाधीशांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या विरोधातील अवमानकारक वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त करत न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून कमी करण्याची मागणी केली

यावेळी तहसीलदार आर. आर. बुरली यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात प्रकाश दुंडारे, बाळासाहेब कांबळे, वकील अमित दीक्षांत, शिवाजी कांबळे एस एस निडोणी, सुभाष डाले, ज्योतीकुमार पाटील आदींसह अनेक दलित संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: