राजधानी बेंगळुरसह राज्यात गेल्या महिन्याभरात कोरोनाचा संसर्गाची परिस्थिती कशी राहिली याबाबत सर्व तपशील मागवून काही निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बंगळुरात शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आज दुपारी तज्ज्ञांची बैठक घेणार आहे. बेंगळुरसह राज्यभरात कोरोनाची परिस्थिती कशी राहिली याचा तपशील मागवून त्यावर तज्ज्ञांशी चर्चा करून काही निर्णय घेणार आहे. ५०:५० नियमांना विरोध असल्याबाबतच्या प्रश्नावर, सर्व काही तज्ज्ञांच्या अहवालावर अवलंबून असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.