Vijaypura

पोलिसांच्या जाचाला कंटाळून , एकाच कुटुंबातील तिघांनी घेतला गळफास

Share

मोलमजुरीसाठी गेलेल्या विजापूर येथील एका कुटूंबाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे . चोरीच्या आरोपाखाली पोलिसांकडून दिला जाणारा  त्रास सहन न झाल्यानं , ह्या कुटुंबाने  आत्महत्येचा मार्ग निवडला .

व्हॉइस ओव्हर : मूळचे विजापूर जिल्ह्यातील   मुद्देबिहाळ तालुक्यातील सुलतानपूर येथील एका कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना जुवारीनगर बिरला येथे मंगळवारी घडली आहे .

व्हॉइस ओव्हर : जुवारीनगर बिरला येथे भाडोत्री घरात राहणारे हुलगेप्पा अंबिगेर  (वय ३५ ), त्याचा भाऊ गंगाप्पा अँबिगेर (वय २९ ) तसेच हुलगेप्पाची पत्नी देवम्मा अँबिगेर (वय २८ ) ह्या तिघांनी आत्महत्या केली आहे .

गावामध्ये काही काम मिळत   नसल्याने हुलगेप्पा अंबिगेर याने  आपली पत्नी , भाऊ तसेच दोन लहान मुलींसह जुवारीनगर येथे भाडोत्री घर घेऊन राहत होते .  , देवम्मा ही आपली  १७ वर्षीय  भाऊ  जुवारीनगर  येथे त्यांच्या सोबत येऊन राहिला होता . तो काही लहानसहान कामे करीत होता . काही दिवसांपूर्वी , पोलिसांनी घरी येऊन , देवम्माच्या भावाला घेऊन गेले .  कारण विचारायला पोलीस स्थानकात गेलेल्या देवम्मा आणि तिच्या पतीला पोलिसांनी धमकावले .

जुवारीनगरातील एका घरातील १० लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते . या चोरीमध्ये तुमच्या कुटुंबाचा हात आहे असा आरोप पोलिसांनी केला . तसेच त्यांच्यावर चोरी केल्याचे कबूल करण्यासाठी दबाव टाकला . मात्र त्यांनी चोरीची कबुली न दिल्याने पोलिसांनी त्यांना मारहाण केली . सर्वाना एकत्रित मारहाण करणे ,  काही वेळा स्वतंत्रपणे खोलीत डांबून मारहाण करणे , आम्ही चोरी केली नाही तर आम्ही का कबूल करावे.   पोलीस वारंवार मारहाण करीत होते असे आत्महत्यापूर्व लिहिलेल्या पत्रात , त्यांनी पोलिसांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाबद्दल लिहिले आहे .

पोलीस स्थानकात या तिघांना डांबून, नंतर देवम्माच्या भावाला पोलीस कुठेतरी घेऊन गेले . काही वस्तू घेऊन स्टेशनमध्ये परतले , त्यानंतर देवम्मा , हुलगेप्पा आणि गंगाप्पा याना स्टेशनमधून सोडण्यात आले .   पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे , ह्या तिघांनी घरी येऊन , गळफास घेऊन आत्महत्या केली .

अधिक तपास करण्यात येत आहे .

 

Tags: