Belagavi

प्रकाश एतकोटी यांचा वडगावमध्ये सत्कार

Share

श्री रामचरित मानसयोग साधनेच्या प्रचारासाठी प्रकाश गुरुनाथ एतकोटी यांनी बेळगावातील वडगाव ते बदामी बनशंकरी देवस्थानापर्यंत दिवस उपवास राखून पदयात्रा केली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री रामचरित मानसयोग साधनेच्या प्रचारात गुंतलेले प्रकाश गुरुनाथ एतकोटी यांनी नुकतीच वडगाव ते बदामी बनशंकरी देवस्थानापर्यंत ९ दिवस उपवास राखून पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचा स्वकुळ साळी आणि देवांग समाजातर्फे प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक संजय सव्वाशेरी, परशुराम भंडारी, श्रीकांत साखरे, बाबू दिवटे, गायत्री सुपे आदी उपस्थित होते.

 

Tags: