Belagavi

प्राजक्ता बेडेकर यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन

Share

 बेळगावात विमल फौंडेशन पुरस्कृत सौ. प्राजक्ता बेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रतिष्ठित पोतदार ज्वेलर्स यांच्या हॉलमार्क प्रमाणित सोन्याने सजलेल्या हलव्याच्या दागिन्यांचा प्रदर्शन सोहळ्याचा उदघाटन समारंभ आज पार पडला.

होय, बेळगावातील अनसूरकर गल्लीतील छत्रे वाडयात मंगळवारी सकाळी सौ. प्राजक्ता बेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रतिष्ठित पोतदार ज्वेलर्स यांच्या हॉलमार्क प्रमाणित सोन्याने सजलेल्या हलव्याच्या दागिन्यांचा प्रदर्शन सोहळ्याचा उदघाटन समारंभ पार पडला. अंजली गाडगीळ, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, प्राजक्ता बेडेकर, श्वेता दीपक जाधव, सीमा अनिल पोतदार आदींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्राजक्ता बेडेकर यांनी स्वतःच्या संकल्पनेतून हलव्यापासून बनवलेले आणि सोन्यापासून सजलेले राधाकृष्ण, बाळकृष्णाचे सुंदर दागिने या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

यावेळी माहिती देताना प्राजक्ता बेडेकर म्हणाल्या, हलव्यापासून दागिने मी आधीपासूनचबनव्ते. मात्र त्यांना सोन्याचा साज चढवून दागिने बनवायची संकल्पना ३ वर्षांपासून डोक्यात होती. ती आता साकारली आहे. यासाठी पोतदार ज्वेलर्सच्या सीमा व अनिल पोतदार यांचे सहकार्य लाभले आहे. विमल फौंडेशनच्या सहकार्याने आज त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, हलव्याचे दागिने अनेकजण बनवितात. मात्र सोन्याचा साज दिलेले हलव्याचे दागिने बनविण्याची किमया प्राजक्ता बेडेकर यांनी साधली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. अलीकडच्या काळात हा एक चांगला व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. युवा उद्योजकांना हा एक चांगला व्यवसाय ठरेल असे त्या म्हणाल्या.

शहर-परिसरातील अनेक महिलांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी करून आनंद व्यक्त केला.

 

 

Tags: