Belagavi

रायचूर जिल्हा न्यायाधीशांच्याविरोधात बेळगावमध्ये आंदोलन

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र हटविण्याची मागणी करणारे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या विरोधात बेळगावमध्ये आंदोलन छेडत निदर्शने केली.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान कोर्ट प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र काढून टाकण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यामुळे दलित संघटनांनी नाराजी व्यक्त करत अशा न्यायाधीशांवर देशद्रोहाचा खटला भरविण्याची मागणी करत बेळगावमध्ये आंदोलन छेडले.

कर्नाटक छलवादी क्षेमाभिवृद्धी संघ आणि आंबेडकर युवा मंच यांच्या वतीने बेळगावमध्ये आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी शहरातील आंबेडकर गार्डन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा निषेध नोंदवत आंदोलन छेडले.

Tags: