Hukkeri

इंदिरा कँटीन सुरु करण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा आग्रह

Share

: हुक्केरी कोर्ट सर्कल परिसरात गेल्या चार वर्षांपूर्वी इंदिरा कँटीन उभारण्यात आले आहे. सर्व उपकरणे असलेल्या या इंदिरा कँटीन ची सध्या अवस्था दयनीय झाली असून या कॅन्टीनच्या खिडक्या, दरवाजे, मोडक्या स्थितीत दिसून येत आहेत. शिवाय हा परिसर दुर्गंधी, आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे.

यासंदर्भात इन न्यूजशी बोलताना हुक्केरी तालुका काँग्रेस अल्पसंख्याक घटकचे अध्यक्ष शानूल तहसीलदार यांनी बोलताना सांगितले कि, काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी गरिबांना अल्प दरात अन्न मिळावे, यासाठी इंदिरा कँटीनचा शुभारंभ केला. हुक्केरी तालुक्यात देखील इंदिरा कँटीन उभारण्यात आले आहेत. सुसज्ज असे कँटीन उभारण्यात येऊनही अद्याप ते सुरु करण्यात आले नाहीत. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे देण्यात येत असून याठिकाणी भाजप सरकार असून देखील गरिबांसाठी अंमलात आणलेल्या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. हे कँटीन तातडीने सुरु करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

चिकोडी काँग्रेस घटक चे सचिव राजू शिदनाळ बोलताना म्हणाले, सिद्धरामय्या सरकारने गरिबांना अत्यल्प दरात आहार मिळावा यासाठी इंदिरा कँटीनची निर्मिती केली होती. परंतु सध्या सरकारचा पैसे वाया जात असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जनता, कुली कर्मचारी, रिक्षा चालक यासारख्या अनेकांसाठी इंदिरा कँटीन सोयीचे ठरले असते. केवळ १० रुपयात अन्न देण्याची सुविधा या कँटीनच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु हे कँटीन अद्यापही बंद स्थितीत असून कँटिनमधील सर्व सामुग्री वाया गेल्याचे मत शिदनाळ यांनी व्यक्त केले.

यावेळी चिदानंद करडी, सुलतान अम्मानगी , मल्लप्पा चिक्कलगुड्ड आदींसह इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: