Hukkeri

हुक्केरी येथील तरुण बाईक रॅलीच्या माध्यमातून मुरुडेश्वरला रवाना

Share

हुक्केरी आणि घटप्रभा येथील युवक प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रॉयल एन्फिल्ड ग्रुप बनवून मुडलगी ते मुरुडेश्वर पर्यंत बाईक रॅलीच्या माध्यमातून रवाना झाले.

सुमारे ३० बाईकवर स्वार झालेल्या युवकांना हुक्केरी नगरपालिका सदस्य आणि पोलीस इन्स्पेक्टर रफिक तहसीलदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व वाहतुकीचे नियम पाळून हि रॅली यशस्वी करण्याची सूचनाही उपस्थितांनी केली.

या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी संवाद साधताना सांगितले कि, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने गोकाक, घटप्रभा, मुडलगी येथील युवक बाईक रॅलीचे आयोजन करतात. दरवर्षी मुरुडेश्वर देवस्थान येथे बाईक रॅलीच्या माध्यमातून जाऊन विशेष पूजा करण्यात येत असल्याचे या बाइकस्वाराने सांगितले.

यावेळी नगरपालिका उपाध्यक्ष आनंद गंध, सदस्य राजू कुरुंदवाडे , राजू मुन्नोळी, जयगौडा पाटील, मधुकर करनिंग, बसवराज पट्टणशेट्टी, गजबर मुल्ला, अमित पट्टणशेट्टी, अमित बागलकोट, राहुल मलगौडन्नावर आदींसह इतर मान्यवर, बाईकस्वार उपस्थित होते.

Tags: