hubbali

काँग्रेस सत्तेत येईल हा डीकेशी-सिद्धू यांचा भ्रम : जगदीश शेट्टर

Share

 माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातच अंतर्गत धुसफूस आहे. राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल या भ्रमात ते दोघे आहेत असा टोला माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी लगावला.

हुबळीत रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टर म्हणाले कि, काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या की काँग्रेसचा पत्ताच राहणार नाही. त्यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे आता हे सर्वांच्या लक्ष्यात येत आहे.  निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा सफाया होईल.

अर्थसंकल्पावर बोलताना शेट्टर म्हणाले की, मुख्यमंत्री बसवराज बोम्मयी यांच्या नेतृत्वाखालील अर्थसंकल्प राज्यातील जनतेसाठी वरदान ठरेल. अर्थसंकल्पात विशेष प्रकल्पांसाठी अधिक अनुदान राखून ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 

 

 

 

Tags: