hubbali

केंद्र सरकारतर्फे संतुलित अर्थसंकल्प सादर : उद्योजक संघाचे अध्यक्ष विनय जवळी यांचे मत

Share

केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पासंदर्भात आज बेळगावमधील उद्योजक संघाच्यावतीने प्रतिक्रिया व्यक्त केली असून हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांच्या दूरदृष्टिकोनातून सादर करण्यात आल्याचे मत संघाचे अध्यक्ष विनय जवळी यांनी व्यक्त केले आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा कॅपिटल इन्वेस्टमनेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे. पाच नद्यांच्या जोडणीसंदर्भातील डीपीआर तयार करण्यासंदर्भात प्राधान्य देण्यात आले असून कोरोना काळात देखील अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे यातून दिसून येते. लघु उद्योग, कृषी उद्योग यांना प्रोत्साहन देण्याचा विचार, गंगा नदी शेजारी ऑरगॅनिक फार्मिंगची संधी हे सर्व मुद्दे समाधानकारक आहेत.

३ कोटी ८० लाख घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गरिबांसाठी अधिकाधिक घरे बांधण्याची आणि जमिनीची नोंदणी सुलभ करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला असून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ६०% भर स्थानिक खरेदीवर देण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात आला आहे. आयकर वाढीची अपेक्षा होती मात्र हि अपेक्षा पूर्ण करता आली नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Tags: