बेंगळूरमधील के आर पुरम येथे सुमारे ८.५० कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात आलेल्या भूजल प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते नुकतेच पार पडले.
८.५० कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात आलेल्या भूजल प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केले.
उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हा भूजल प्रकल्प के आर पुरम मधील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यामाध्यमातून ९ प्रमुख विभागांना पाणी पुरवठा होणार आहे. के आर पुरमची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भैरती बसवराज यांनी अनेक विकासकामे राबविली आहेत. लोकहितासाठी कार्य करणारी व्यक्ती म्हणून भैरती बसवराज हे परिचित आहेत. या भूजल प्रकल्पामुळे जनतेला सदुपयोग व्हावा, आणि जनतेने पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
भैरती बसवराज यांच्या प्रयत्नातून निर्माण करण्यात आलेल्या या भूजल प्रकल्पाच्या माध्यमातून प्रमुख ९ विभागातील पाण्याची समस्या निवारणार आहे. जनतेने पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.