चिकोडी येथील साहित्यिक, कवी अजित करीगार यांच्या ‘टाइम टू एक्स्प्लोर’ या निसर्ग रक्षणावर आधारित काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
निसर्गाची काळजी हा देशाच्या आरोग्याचा पाया आहे. अनेक कवी-साहित्यिकांनी निसर्गावर आधारित लेखन केले आहे. याचप्रमाणे कवी अजित करीगार यांनीही निसर्गावर आधारित साहित्यकृतीची निर्मिती केली असून सदर काव्यसंग्रह आजच्या समाजासाठी अत्यावश्यक असल्याचे मत साहित्यिक डॉ. दयानंद नूली यांनी व्यक्त केले.
चिकोडी शहरातील ज्येष्ठ साहित्यिक शिवलिंग हंजी यांच्या फार्महाउस परिसरात जागतिक लिंगायत महासभेच्या युवा घटकाच्या सहयोगाने आयोजित केलेल्या अजित करीगार यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन संभारंभात ते बोलत होते. निसर्गाबद्दल जनमानसात जागृती करणारी हि साहित्यकृती असल्याचे मत डॉ. दयानंद नुली यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक आणि जागतिक लिंगायत महासभेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष व्याख्याते शिवलिंग हंजी यांनी प्रास्ताविक केले. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सध्या कवींची कमतरता असून आजच्या युवापिढीसाठी प्रोत्साहन देणारी साहित्यकृती अजित करीगार यांनी निर्माण केली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘टाइम टू एक्स्प्लोर’ या काव्यसंग्रहाचे कवी अजित करीगार यांनी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल माहिती दिली. या पुस्तकात आपल्या दैनंदिन जीवनात निदर्शनास येणाऱ्या निसर्गातील घटकांवर आधारित साहित्य या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून उतरवण्यात आल्याचे करीगार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती शिवमूर्ती हे होते. कापड व्यापारी रवींद्र हंपणावर, एम ए पाटील, दैविक आडके, लक्ष्मी करीगार, नंदिनी बावची, तुकाराम कोळी, जागतिक लिंगायत महासभेचे युवा घटकचे समूह, जिल्हा आंदोलक समितीचे सदस्य उपस्थित होते. विजयलक्ष्मी हंजी यांनी प्रार्थना म्हटली तर सिद्दू पाटील यांनी आभार मानले.