प्रजासत्ताकदिनी रायचूर जिल्ह्यात न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवरणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ चिकोडी तालुक्यातील इंगळी गावात आंदोलन छेडत निषेध नोंदविण्यात आला.
न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा निषेध नोंदवत इंगळी गावात प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे छायाचित्र हटविल्यानंतर आपण ध्वजारोहण करू असे वक्तव्य न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांनीं केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी त्यांचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी मल्लिकार्जुन गौड यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात पोपट कांबळे, प्रताप कांबळे, राहुल शिंगे, महादेव ऐवळ्ळी, सुनील सुलतानपुरे, प्रतिभा शास्त्री, स्वाती कोळी, गौरा शास्त्री, विनयश्री शिंगे, दीपा शिंगे आदींनी सहभाग घेतला होता.