बेंगळुरातील के. आर. पुरमध्ये १०० खाटांच्या ‘माता आणि शिशु‘ इस्पितळाची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी कोनशिला बसवली.
बेंगळुरातील के. आर. पुरमधील सरकारी इस्पितळाच्या आवारात १०० खाटांचे ‘माता आणि शिशु’ इस्पितळ उभारण्यात येणार आहे. त्याची कोनशिला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज भूमिपूजन करून बसवली. यावेळी नगरविकास मंत्री भैरती बसवराज, आरोग्य सचिव डॉ. के. सुधाकर, सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर आदी उपस्थित होते.