Hukkeri

रंभापुरी मठाच्या स्वामीजींचे हुक्केरीत प्रवचन

Share

निस्वार्थ वृत्ती ठेवून केलेल्या कामाचे फळ निश्चितच मिळते असे विचार रंभापुरी मठाचे जगद्गुरू वीरसोमेश्वर शिवाचार्य भगवद्पाद यांनी मांडले.

हुक्केरीतील हिरेमठात गुरुवारी जगद्गुरू वीरसोमेश्वर शिवाचार्य भगवद्पाद यांचे प्रवचन झाले. स्वामीजी पुढे म्हणाले, सतत ३८ वर्षांच्या सेवेचे फळ म्हणून जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांना आज जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. रंभापुरी पीठाचा गुरु कारुण्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे याचा आनंद वाटतो. अशा तऱ्हेने शुद्ध भावनेने समाजसेवा करण्यास आपण शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

यावेळी हुक्केरी वीज सहकारी संघाचे संचालक पृथ्वी रमेश कत्ती, महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महावीर निलजगी, रीड्स संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, हुक्केरी कन्नड लोकगीत परिषदेचे गौरवाध्यक्ष शिवानंद जिरली, सुहास नुली, प्रसिद्ध व्यापारी चन्नाप्पा गजबर, सुरेश जिनराळे आदींनी स्वामीजींचे आशीर्वाद घेतले.

यावेळी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, क्यारगुड्डचे अभिनव मंजुनाथ स्वामीजींचा श्रीमठातर्फे सत्कार करण्यात आला.

 

Tags: