Hukkeri

राजकारणासाठी माझ्यावर चुकीचे आरोप : काडगौडा पाटील

Share

करगाव ग्रामपंचायतीच्या विकासकामांसंदर्भात माहिती विचारण्यासाठी गेले असता आपल्यावर अब्रुनुकसानीचा खोटा दावा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप चिकोडी जिल्हा जेडीएस नेते काडगौडा पाटील यांनी केलाय.

ग्राम पंचायत विकास कामकाजासंदर्भात माहिती हक्क अंतर्गत विचारणा करण्यात आल्यास माझ्यावर चुकीच्या पद्धतीने राजकारणातून खोटा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप चिकोडी जेडीएस नेते काडगौडा पाटील यांनी केलाय. आपल्या शेतवाडीतील घरात प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधताना हि माहिती दिली आहे.

करगाव ग्राम पंचायतीमध्ये २००८ ते २०२१ पर्यंत सुवर्ण ग्राम आणि नरेगा योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामकाजांसंदर्भात विचारणा करण्यात आली होती. यावेळी पीडीओंनी रिकामा कागद देण्यात आला. सदर माहिती प्रसारमाध्यमांसमोर जाहीर करण्यात आल्यानंतर सध्याच्या अध्यक्षांच्या संगनमताने माझ्यावर अब्रुनुकसानीची खोटी तक्रार करण्यात आली असल्याचा आरोप काडगौडा पाटील यांनी केलाय. आपण केवळ ग्राम पंचायतीच्या सुधारणेसंदर्भात माहिती विचारली होती. माझे कुटुंब हे प्रतिष्ठित आणि महत्वाकांक्षी असल्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचाही आरोप पाटील यांनी केलाय.

अशा कोणत्याही दबावाला आपण बळी पडणार नसून कायद्यानुसार कोणतीही लढाई लढण्यासाठी मी तयार आहे. विकास आणि सुधारणेसाठी केलेल्या आंदोलनात माझा दोष असल्यास कायद्यानुसार मला मिळणाऱ्या शिक्षेसाठी मी तयार असल्याचेही काडगौडा पाटील यांनी स्पष्ट केले.

Tags: