चिकोडी तालुक्यातील एकसंबा शहरात कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून विविध रस्ते विकास कामकाजाला आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते सुरुवात करण्यात आली.
चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे आमदार गणेश हुक्केरी यांनी एकसंबा, मलिकवाड मार्गाचे १ कोटी ५० लाखांच्या खर्चातून सीडी वर्क आणि मलिकवाड दत्तवाड ब्रिज पर्यंतच्या रस्त्याचे ३ कोटी ३४ लाख रुपयांच्या खर्चातून रस्ते विकास कामकाजाला चालना दिली. २ कोटी रुपयांच्या खर्चातून एकसंबा शहरातील कराळे पेट्रोलपंप पासून चिकोडी सदलगा मुख्य रस्त्यापासून संतुबाई शेतवाडी मार्ग, सांबरा शेतवाडी मार्ग, कर्नाटक कोडी रस्ता विकास कामकाजाचीही सुरुवात करण्यात आली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणेश हुक्केरी यांनी एकसंबा नगर पंचायत निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्याचे आभार मानत एकसंबा येथे हायटेक विकास करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यानंतर नगर पंचायत सदस्य पोपट सप्तसागरे हे बोलताना म्हणाले, आमदार गणेश हुक्केरी आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली एकसंबा नगर पंचायत निवडणुकीत जनतेने मला आशीर्वाद दिला आहे. जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे एकसंबा परिसराचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी कंत्राटदार रवी माळी, राजू वंटमुट्टे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते बी बी बेडकिहाळ, पाटबंधारे विभागाचे अभियंते मुकुंद शिंदे, एक्स्म्ब नगर पंचायतीचे सदस्य शिवगौंडा बावचे, जमनशा मकानदार, उमेश सत्वार, अंकुश खोत, मारुती माने, सुभाष कल्याणी आदी उपस्थित होते.