आपला वाढदिवस आणि स्वतःच्या नेतृत्वाखालील सरकारला ६ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळुरातील आपल्या निवासस्थानी गोपूजा केली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शंकर पाटील-मुनेनकोप्प आदींनी मुख्यमंत्री बोम्मई यांना दूरध्वनीवरून जन्मदिवसाच्या व सरकारला ६ महिने पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. आरटी नगरातील निवासस्थानी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेऊन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, नगरविकास मंत्री भैरती बसवराज, पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी येडियुरप्पा यांनी बोम्मई यांचा शाल घालून सत्कार केला.
दरम्यान, आपल्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी बेंगळुरातील विविध देवस्थानांना भेटी देऊन देवदर्शन घेतले.