hubbali

धार्मिक कार्यांवरील निर्बंध निंदनीय : प्रमोद मुतालिक

Share

कोविड, ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्गसूची जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जत्रा-यात्रा आणि उत्सवावर निर्बंध घातले आहेत. ४ फेब्रुवारी पर्यंत सरकारने या सर्वांवरील निर्बंध हटविले नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिलाय.

हुबळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात शासनाने कोविड नियम शिथिल करून सर्व कार्यक्रमांना मंजुरी देणे आवश्यक आहे. सरकारने घातलेल्या धार्मिक कार्यांवरील निर्बंधाचा आपण निषेध व्यक्त करत असून जत्रा, यात्रा आणि उत्सवांवरील निर्बंधामुळे यावर अवलंबून असणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिकांचे हाल होत असल्याचे मुतालिक म्हणाले.

मुतालिक पुढे म्हणाले, सरकार विदेशी संस्कृतीशी निगडित असलेल्या गोष्टींवर निर्बंध न घालता सांप्रदायिक जत्रा यंत्रांवर निर्बंध घालत आहे. अशाचपद्धतीने सर्व गोष्टी घडत राहिल्या तर आगामी काळात भाजप सरकार धुळीला मिळेल. हिंदुत्वाचा दावा करणाऱ्या भाजप सरकारने संप्रदायिकतेला धक्का दिल्यास त्यांना जनतेचा शाप भोवळ, असे मुतालिक म्हणाले. सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्का, सिद्धारूढ मठ यासह राज्यातील अनेक धार्मिक केंद्रांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. येत्या ४ फेब्रुवारी पर्यंत हे सर्व निर्बंध शिथिल करावेत अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिलाय.

उडुपी येथील गर्ल्स कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यात आल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रमोद मुतालिक म्हणाले, हिजाब परिधान करण्यासंदर्भात इतर कोणताही विषय नाही. प्रत्येकाने सामान वस्त्र परिधान केले पाहिजे. यात कोणत्याही जातीचा प्रश्न नाही. धर्माचे स्वातंत्र्य हे ज्याने त्याने आपल्या परीने आपल्या घरापुरते पाळावे. अशांना ट्रान्सफर सर्टिफिकेट देऊन घरी पाठवावे असा सल्लाही त्यांनी दिला. रेल्वेस्थानकावर नमाज पठणाची परवानगी देण्यात आल्यासंदर्भात नाराजी व्यक्त करत हुबळी बॉम्बस्फोटाविषयी अद्याप तपास झाला नसल्यासंदर्भात देखील त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

या पत्रकार परिषदेला अण्णाप्पा देवडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: