हुबळी येथील उनकल क्रॉसनजीक बीआरटीएस दुभाजकाला धडक बसून एका पवन नामक अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हेल्मेट काढून वेगाने जाणाऱ्या या विद्यार्थ्याचा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
हुबळी बीआरटीएस क्रॉस नजीक झालेल्या या अपघातात पवनच मेंदू निष्क्रिय झाला. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी त्याला रुग्णालयात दाखल केले.यावेळी पवनला मृत घोषित करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी पवनच्या कुटुंबियांना अवयवदानासंदर्भात आवाहन केले. या आवाहनानुसार पवनच्या पालकांनी चार रुग्णांना पुनर्जन्म दिला आहे. पवनचे अवयव हुबळी येथील सुचिराय, बेळगावमधील के एल इ, बेंगळुरूमधील अपोलो आणि हुबळीतील किम्स रुग्णालयातील रुग्णांसाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती वेंकटेश मोगेर यांनी दिली.
अवयवदान प्रक्रियेत डॉ. भरत क्षत्री, डॉ.एस.बी.बळीगार, डॉ. ईश्वर होसमनी, डॉ. विद्या यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले. यावेळी पवनच्या पालकांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.