Chikkodi

बेळकुड येथे बसला लटकत विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

Share

अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांना बसला लटकत जीवघेणा प्रवास करावा लागल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील बेळकुड गावात घडली.

होय, बेळकुड गावातील अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून बसला लटकत प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. दररोज बेळकुड गावातील अनेक विद्यार्थी चिक्कोडीसह इतर ठिकाणी शाळा-महाविद्यालयात जातात. मात्र बेळकुड येथे पुरेशा आणि नियमित बसची योग्य सोय नसल्याचा पुरावा हे दृश्य आहे. त्यामुळे विद्यार्थी केएसआरटीसी अधिकार्‍यांना शिव्याशाप देत आहेत.

केएसआरटीसीच्या अधिकार्‍यांनी वेळीच जागे होऊन बेळकुड गावाला नियमित आणि अधिक बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी विध्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: